प्रशांत वर्मांच्या ‘महाकाली’चे नवे पोस्टर प्रदर्शित

युगवार्ता    29-Oct-2025
Total Views |
प्रशांत वर्मांच्या ‘महाकाली’चा नवा पोस्टर प्रदर्शित


मुंबई, 29 ऑक्टोबर, (हि.स.)। ‘हनुमान’सारखी ब्लॉकबस्टर देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्दर्शक प्रशांत वर्मा आता आपला पुढील ऐतिहासिक आणि भव्य चित्रपट ‘महाकाली’ द्वारे पुन्हा एकदा सिनेसृष्टीत नवे वादळ निर्माण करण्यास सज्ज झाले आहेत. या प्रोजेक्टबद्दल चित्रपटसृष्टीत आधीपासूनच प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या अक्षय खन्ना यांच्या शुक्राचार्याच्या शक्तिशाली लूकने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला होता आणि आता ‘महाकाली’चा नवा पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या रोमांचात आणखी वाढ झाली आहे.

पोस्टरमुळे वाढली उत्सुकता

प्रशांत वर्मांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोन्या आणि काचेच्या बांगड्यांनी सजलेला हात दिसतो. जणू अग्नीमध्ये तपून शक्तीचे प्रतीक झालेला. या एका झलकनेच चाहत्यांच्या उत्सुकतेचा कळस गाठला आहे, कारण संकेत स्पष्ट आहे की, भारताच्या पहिल्या महिला सुपरहिरोच्या आगमनासाठी मंच सज्ज झाला आहे.

‘महाकाली’ हा प्रशांत सिनेमॅटिक युनिव्हर्समधील तिसरा चित्रपट आहे. या वेळी दिग्दर्शनाची जबाबदारी पूजा अपर्णा कोल्लुरू यांनी सांभाळली असली, तरी कथा आणि पटकथेमागे अजूनही प्रशांत वर्मांचाच हात आहे. त्यामुळे या चित्रपटातूनही त्यांच्या खास भव्य दृष्टिकोनाची आणि नवीनतेची झलक पाहायला मिळेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

रिलीज डेट अद्याप गुप्त

जरी चित्रपटाबद्दलच्या प्रमोशनल अपडेट्स सतत समोर येत असल्या, तरी मेकर्सनी रिलीज डेट अद्याप गुप्त ठेवली आहे. हीच रहस्यता आणि उत्कंठा ‘महाकाली’ला अधिक चर्चेत आणते आहे.

भव्य सेट्स, पौराणिक कथानक आणि प्रभावी पात्रांनी सजलेला ‘महाकाली’ हा चित्रपट नसून एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. प्रशांत वर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करण्यास सज्ज आहेत.

---------------

हिन्दुस्थान समाचार / हर्षदा गांवकर

Tags